के. संजय मूर्ती यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आज, राष्ट्रपती भवन इथं पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ऑगस्ट २०२० मध्ये CAG म्हणून नियुक्त झालेल्या गिरीश चंद्र मुर्मू यांच्या जागेवर मूर्ती यांची नियुक्ती झाली आहे. याआधी मूर्ती यांनी शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून काम केलं आहे.
Site Admin | November 21, 2024 7:56 PM | cag
के. संजय मूर्ती यांची देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून शपथ
