ईशान्येतल्या राज्यांमधे केंद्रसरकार या राज्यांच्या भागीदारीत काम करत आहे, असं ईशान्य क्षेत्र विकासमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत या राज्यांच्या गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते. या राज्यांमधे क्षमता, विशेषता, आणि मलेशिया, सिंगापूर, जपान, कंबोडिया इत्यादी अग्नेय आशियातल्या देशांशी संपर्क अनुकूलता असल्यानं गुंतवणुकदारांनी या राज्यांमधे गुतवणूक करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ माणिक साहा यांचीही भाषण यावेळी झाली.