मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करायला केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे. तर तेलंगण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून करायलाही केंद्रानं मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं ७ जानेवारी रोजी या नियुक्त्यांसंदर्भातली शिफारस केली होती.
Site Admin | January 14, 2025 9:02 PM
न्यायाधीशपदी नियुक्त्यांसंदर्भातली शिफारस मंजुरी
