गाझा पट्टीच्या तटवर्ती भागातली आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडल्यामुळे तिथल्या २ हजार आजारी बालकांना वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या देशात प्रवेश दिला जाईल, असं जॉर्डनचे प्रधानमंत्री जाफर हसन यांनी म्हटलं आहे. जॉर्डनच्या सरकारी वृत्त संस्थेनं म्हटलं आहे की, पॅलेस्टिनींचं कोणत्याही प्रकारे पुनर्वसन अथवा विस्थापन होऊ नये, अशी जॉर्डन सरकारची स्पष्ट भूमिका असून, प्रधानमंत्री हसन यांनी त्याचं समर्थन केलं आहे. पॅलेस्टिनींच्या कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी जॉर्डन जबाबदार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Site Admin | February 13, 2025 1:37 PM | Jordan | PM Jaafar Hassan
गाझा पट्टीतल्या आजारी बालकांना उपचारांसाठी जॉर्डनमध्ये प्रवेश
