अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोविड-1९ चा संसर्ग झाल्यानंतर,अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घ्यावी यासाठीचा दबाव वाढत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावशाली नेते, तसंच कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी ॲडम शिफ यांनी,अध्यक्ष बायडन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचं जाहीर आवाहन केलं आहे.
बायडन यांनी आपल्या वयाशी निगडित आरोग्य आणि स्वास्थ्याचा विचार करून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली नाही, तर देश आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी ते हितकारक ठरेल, असं मत अमेरिकी संसदेच्या बहुसंख्य नेत्यांनी व्यक्त केलं आहे.अमेरिकेत येत्या नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षानं आपला उमेदवार म्हणून बायडन यांची निवड केली आहे.