सक्तवसुली संचालनालयानं ज्ञानराधा बहुराज्यीय सहकारी पत संस्था लिमिटेड आणि इतरांची सुमारे १ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबई, छत्रपती संभाजी नगर, बीड आणि जालना जिल्ह्यातल्या इमारती आणि जमिनींचा समावेश आहे. या कंपनीविरोधात राज्यातल्या अनेक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींच्या आधारे ईडीनं हा तपास सुरु केला होता. या कंपनीनं जास्त परतावा देण्याचं अमिश दाखवून ४ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचं या तपासात निष्पन्न झालं आहे.
Site Admin | October 10, 2024 6:57 PM | ED | ज्ञानराधा बहुराज्यीय सहकारी पत संस्था लि.