जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे. ९० अपक्षांसह एकूण २१९ उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत. सात जिल्ह्यांमधल्या मिळून २४ विधानसभा मतदारसंघांमधे मतदान होणार असून त्यात जम्मूतले ४ तर काश्मीर खोऱ्यातले १६ मतदारसंघ आहेत. ऑगस्ट २०१९ मधे कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश घोषित झाला आणि त्यानंतर प्रथमच तिथं विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या दृष्टीनं जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासन सज्ज असून अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरता सर्वत्र सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात आहेत. या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी २३ लाख २७ हजार ५८० मतदार पात्र आहेत.
Site Admin | September 17, 2024 8:05 PM | Assembly Elections | J&K