जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रचार काल संध्याकाळी संपला. दुसऱ्या टप्प्यात २६ विधानसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू प्रदेशातल्या रियासी, राजौरी आणि पुंछ तर काश्मीर खोऱ्यातल्या श्रीनगर आणि बडगाम या जिल्ह्यांचा समावेश आहे. या दुसर्या टप्प्यात २५ लाख ७८ हजार मतदार २३९ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद करणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होत असून ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यापैकी १८ सप्टेंबरला निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६१ टक्क्यांहून अधिक मतदान झालं होतं. तर उर्वरित ४० विधानसभा मतदारसंघांसाठी तिसऱ्या टप्प्याचं मतदान येत्या १ ऑक्टोबरला होणार आहे.
Site Admin | September 24, 2024 1:33 PM | Jammu Kashmir Assembly Elections 2024