जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. उमेदवारी अर्ज आजपासून येत्या ५ सप्टेंबरपर्यंत भरता येतील. अर्जांची छाननी येत्या ६ सप्टेंबरला होणार असून उमेदवारी मागे घेण्याची मुदत ९ सप्टेंबरपर्यंत आहे. येत्या २५ सप्टेंबरला मतदान होणार आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या गंदेरबाल, श्रीनगर, बडगाम, राजौरी, पूँछ आणि रियासी या ६ जिल्ह्यात मिळून २६ मतदारसंघांमधे या टप्प्यात निवडणूक होणार आहे. सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या ४ ऑक्टोबरला होणार आहे.
Site Admin | August 29, 2024 12:59 PM | Assembly Elections | J&K election
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी
