डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हरियाणात भाजपाला तर जम्मूकाश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत

जम्मू आणि काश्मीर तसंच हरियाणा विधानसभा निवडणूकीची मतमोजणी  आज झाली. 

 

जम्मू काश्मीरमध्ये ९० विधानसभा मतदारसंघापैकी ४२ ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार विजयी झाले असून भाजपाचे उमेदवार २९ ठिकाणी विजयी झाले आहेत. काँग्रेस ६, पीडीपी ३ तर जेपीसी, सीपीएम आणि आपचे उमेदवार प्रत्येकी एका ठिकाणी विजयी झाले आहेत. सात ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बडगाम आणि गंदेरबाल या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 

 

हरियाणात ९० मतदारसंघांपैकी ४८ ठिकाणी भाजपा उमेदवार  तर ३६ ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. भारतीय लोकदलाचे उमेदवार दोन ठिकाणी तर अपक्ष उमेदवार तीन ठिकाणी विजयी झाले आहेत. एका मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार  आघाडीवर आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट जुलाना मतदारसंघातून काँग्रेसकडून विजयी झाल्या आहेत. तसंच मुख्यमंत्री नायबसिंग सैनी हे लडवा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा