जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ टप्प्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण ६३ पूर्णांक ८८ शतांश टक्के मतदान झालं असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. येत्या मंगळवारी मतमोजणी होणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये या वर्षअखेरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी, विधानसभा निवडणुकीदरम्यान तैनात केलेला बंदोबस्त डिसेंबरपर्यंत कायम ठेवला जाणार आहे.