हरियाणामधल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जननायक जनता पार्टी आणि आझाद समाज पार्टी – कांशीराम, यांनी आघाडी केली आहे. जेजेपी चे नेते दुष्यंत सिंह चौटाला आणि एएसपी चे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. ही आघाडी हरियाणातल्या सर्व ९० जागा लढवणार आहे. यातल्या ७० जागांवर जेजेपी तर २० जागांवर एएसपी निवडणूक लढेल. हरियाणामध्ये १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होतील.
Site Admin | August 27, 2024 8:19 PM