विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत विविध क्वांटम स्टार्ट अप्सची घोषणा केली. काही निवडक स्टार्ट अप्स क्वांटम तंत्रज्ञानाच्या प्रमुख क्षेत्रांचं प्रतिनिधित्व करतील आणि यातून व्यापरिकरणाला चालना मिळेल असं ते म्हणाले. क्वांटम मिशनची अंमलबजावणी करणाऱ्या जगभरातल्या काही मोजक्या राष्ट्रांमध्ये भारत आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
Site Admin | November 26, 2024 7:26 PM | Minister Dr. Jitendra Singh