मेंदूला झालेल्या मलेरियामुळं गेल्या १० दिवसात झारखंडमधल्या साहिबगंज जिल्ह्यातल्या अधिसूचित आद्य जमातीची ५ मुलं दगावली असल्याचं वृत्त आहे. आणखी सुमारे २० मुलं या विकारानं ग्रस्त असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं औषध पुरवठा केला जात असून अधिक तपासासाठी एक वैद्यकीय पथक रवाना करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून झारखंड मधल्या इतर जिल्ह्यातल्या बालकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत.
Site Admin | March 24, 2025 8:08 PM | Jharkhand | Malaria
झारखंडमध्ये मेंदूला झालेल्या मलेरियामुळं ५ मुलं दगावली
