झारखंड राज्याच्या विधानसभेचा विश्वासदर्शक ठराव संमत होताच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळात मावळते मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह अन्य ११ आमदारांचा समावेश आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पूर्वीच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार बसंत सोरेन तसंच काँग्रेसचे आमदार बादल पत्रालेख यांना कॅबिनेट मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे.
Site Admin | July 8, 2024 7:54 PM | झारखंड | हेमंत सोरेन
झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला मंत्रिमंडळाचा विस्तार
