झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार असून त्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. उद्या सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान सुरळीत पार पडावं यासाठी राज्यभरात एकूण १४ हजार २१८ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. केंद्रीय निमलष्करी दलाच्या सहाशे तुकड्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात १२ जिल्ह्यांमधल्या ३८ मतदारसंघांत मतदान होणार असून एकूण ५२८ उमेदवार रिंगणात आहेत.
Site Admin | November 19, 2024 1:32 PM | JHARKHAND ASSEMBLY ELECTIONS