झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर खासगी वाहनांवर बॅनर वापरण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी सांगितलं. झारखंडमध्ये १४ हजार २१८ मतदान केंद्र असून ३१ मतदान संघांमध्ये आज दुपारी ४ वाजता आणि उर्वरित मतदान संघांमध्ये सायंकाळी ५ वाजता प्रचार संपणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्याच्या विविध भागातून १९६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत ८५ प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आले आहेत.
Site Admin | November 18, 2024 9:42 AM | Jharkhand Assembly Election