डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.५१ टक्के मतदान

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांतल्या ४३ मतदारसंघांमध्ये काल ६६ पूर्णांक ५१ शतांश टक्के मतदान झालं. सर्वाधिक म्हणजे ७९ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान खरसावन इथं नोंदवलं गेलं. काल ६८३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं. सरायकेलामधून भाजपचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन, रांचीमधून राज्यसभा खासदार आणि झामुमोचे उमेदवार महुआ माजी, लोहरदगामधून काँग्रेसचे रामेश्वर ओराव, जमशेदपूर (पश्चिम) मधून जनता दल (युनायटेड)चे सरयू राय तसंच, इचागढ मधून AJSU चे हरे लाल महतो अशा महत्त्वाच्या उमेदवारांचं भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. २० नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा