झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची इंडिया आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आज झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांची भेट घेतली आणि राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं. तत्पूर्वी सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नव्या सरकारचा शपथविधी २८ नोव्हेंबरला होईल, अशी माहिती त्यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत इंडिया आघाडीला ५६ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २४ जागांवर विजय मिळाला आहे.
Site Admin | November 24, 2024 6:36 PM | Jharkhand Assembly Elections 2024