झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी धनवर मतदारसंघातून तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे सराइकेला मतदारसंघातून लढणार आहेत.
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस ७० जागा लढवणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. ७० जागांचं पक्षनिहाय जागावाटप लवकरच निश्चित केलं जाईल. ११ जागा राजद आणि मार्क्सवादी-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष लढवणार आहे, पक्षनिहाय उमेदवारांची यादी तयार असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही सोरेन यांनी सांगितलं.