डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

झारखंडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान

झारखंड विधानसभेची तसंच १५ राज्यातल्या २ लोकसभा आणि ४८ विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकही केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात ८१ मतदारसंघात मतदान होईल आणि महाराष्ट्रासोबत २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. 

 

वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात तसंच राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडमधल्या केदारनाथ विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळापत्रकानुसार निवडणूक होईल. इतर ठिकाणी १३ नोव्हेंबरला मतदान होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा