झारखंडमधल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलानं इंडिया महायुतीत सामील व्हायचं ठरवलं आहे. आरजेडीच्या नेत्यांच्या रांची इथं आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा करून आरजेडी आपल्या उमेदवारांची नावं निश्चित करणार आहे. आरजेडीच्या उमेदवारांची तसंच मतदार संघांची यादी तयार असून ती आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
Site Admin | September 11, 2024 7:53 PM