डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या टप्प्यात उद्या झारखंडच्या १२ जिल्ह्यातल्या ३८ मतदारसंघांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार असून ३१ नक्षलग्रस्त भागांत मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.

या निवडणूकीत ५५ महिला उमेदवारांसह ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे १ कोटी २३ लाख मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. आंतरजिल्हा सामा बंद केल्या असून घुसखोर आणि समाजविरोधी घटकांना रोखण्यासाठी बिहार आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात संयुक्त कारवाई सुरू आहे. कोणत्याही आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्यासाठी हेलिकॉप्टरची सेवा सुरू केली आहे. प्रत्येक मतदानकेंद्रावर केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान तैनात केले आहेत.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सभापती रवींद्र नाथ महतो, भाजपा प्रदेशअध्यक्ष बाबूलाल मरांडी, विरोधी पक्षनेते अमरनाथ कुमार बौरी, AJSU चे अध्यक्ष सुदेश कुमार महतो आणि कल्पना सोरेन हे महत्त्वाचे उमेदवार आहेत. इरफान अन्सारी, हाफिझुल हसन, दीपिका पांडे सिंग आणि बेबी देवी हे चार मंत्रीही रिंगणात आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी मतदारांना निर्भीडपणे मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा