झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज सायंकाळी संपला. या टप्प्यातील ४३ जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात प्रचारादरम्यान दोनशेहून अधिक सभा घेण्यात आल्याचं वृत्त आमच्या वार्ताहरानं दिलं आहे. एनडीएनं बांगलादेशी घुसखोरी, हेमंत सोरेन सरकारविरोधातील भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि मासिक रोख रक्कम हस्तांतरण योजना आदी मुद्दे उपस्थित केले तर इंडीयानं केंद्राकडून झारखंडविरोधात भेदभाव, राज्याला पुरेसा निधी वाटप आणि मासिक हस्तांतरण आदी मुद्दे उपस्थित केले आहेत. दरम्यान मतदानासाठीची सर्व तयारी अंतिम टप्यात असून आजपासून मतदान पथकं आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना करण्यात येत असल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Site Admin | November 11, 2024 8:15 PM | Jharkhand Assembly Election