झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात ३८ जागांसाठी मतदान होणार आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि १ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
झारखंडमधे पहिल्या टप्प्यातलं मतदान येत्या १३ नोव्हेंबरला होणार असून, या टप्प्यासाठी आतापर्यंत २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी राबवण्यात येत राज्याच्या ग्रामीण भागात मतदानाची वेळ कमी करण्यात आल्याचा झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते सुप्रियो भट्टाचार्य यांचा आरोप निवडणूक आयोगानं फेटाळला आहे. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या फक्त ९८१केंद्रांवर मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. इतर ठिकाणी मतदानाची वेळ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी दिली.