झारखंडमध्ये पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात जराईकेला पोलिस स्थानकांतर्गत सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान कोब्रा आणि झारखंड जग्वार दलाचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. कोब्रा बटालियन, सीआरओएफ, झारखंड जग्वार आणि चाईबासा पोलिस दलाचे संयुक्त शोध अभियान अद्याप सुरू आहे.
दरम्यान, लातेहार जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध पोलिस दलाने केलेल्या दुसऱ्या शोध मोहिमेत माओवादी संघटनेच्या दोन सबझोनल कमांडरसह सहा नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त कुमार गौरव यांनी माध्यमांना माहिती दिली.