उत्तर प्रदेशातल्या झाशी शहरातल्या महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात, काल रात्री लागलेल्या आगीत, अतिदक्षता विभागातल्या १० बालकांचा जळून मृत्यू झाला तर १६ बालकं जखमी झाली आहेत. ही दुर्घटना घडली तेव्हा या अति दक्षता विभागात ४७ बालकं होती. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची त्रिस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवजात बालकांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. तसंच, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक बालकाच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.