परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रि सिबिहा यांची काल रात्री उशिरा जर्मनीतल्या म्युनिच सुरक्षा परिषदेत भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्याच्या अधिक प्रगती बरोबरच युक्रेन संघर्ष सोडवण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. डॉ. जयशंकर यांनी जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस यांची देखील भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य आणि युक्रेनच्या विकासावर चर्चा केली.
परराष्ट्र मंत्र्यांनी जर्मनीच्या बव्हेरिया राज्याचे अध्यक्ष मार्क्स सॉडर यांची म्युनिच मध्ये भेट घेतली. यावेळी भारत-जर्मनी आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्यावर चर्चा करत आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर विचार विनिमय केला. त्याच वेळी सॉडर यांचं स्वागत करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं जयशंकर म्हणाले.