डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 28, 2024 1:00 PM | ICC | Jay Shah

printer

जय शाह यांची ICCच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद – ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी शहा हे एकमेव उमेदवार होते. यावर्षी 1 डिसेंबर रोजी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. 35 वर्षांचे शाह हे पद भूषवणारे सर्वात तरुण उमेदवार आहेत. ICC चे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बर्कले यांनी तिसऱ्यांदा हे पद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.  यावर्षी नोव्हेंबर मध्ये ते सेवानिवृत्त होतील.