मुंबईत आयोजित २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला काल प्रारंभ झाला.
यावेळी ज्येष्ठ पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना चित्रपट क्षेत्रातल्या भरीव योगदानाबद्दल ‘एशियन कल्चर’ या विशेष पुरस्कारानं महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.
या महोत्सवाचं हे २१ वर्ष असून, आशियाई देशांतले विविध चित्रपट इथं पहायला मिळतील. ‘ब्लॅक डॉग’ चित्रपटानं यंदाच्या महोत्सवाला प्रारंभ झाला.