ICC,अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या कसोटी क्रिकेट गोलंदाजांच्या मानांकनात भारताच्या जसप्रित बुमराहनं पुन्हा अग्रस्थान पटकावलं आहे. पर्थ इथं झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे बुमराहनं दक्षिण आफ्रिकेच्या कगीसो रबाडाला, तसंच दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हैजलवुडला मागं टाकत पहिलं स्थान मिळवलं. पर्थ कसोटीत बुमराहनं ८ गडी बाद केले होते.
Site Admin | November 27, 2024 8:22 PM | ICC T20 | Jasprit Bumrah
ICC कसोटी क्रिकेट गोलंदाजी मानांकनात जसप्रित बुमराह पुन्हा अग्रस्थानी
