डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जास्मिन पाओलिनीची लढत बार्बोरा क्रेजिकोव्हाशी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज संध्याकाळी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ७व्या मानांकित जास्मिन पाओलिनीची लढत ३१व्या मानांकित बार्बोरा क्रेजिकोव्हाशी होणार आहे.चेक प्रजासत्ताकच्या क्रेजिकोव्हानं गुरुवारी उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना हिच्यावर विजय मिळवून विम्बल्डनच्या पहिल्याच अंतिम फेरीत प्रवेश केला.इटलीच्या पाओलिनीनं उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या डोना वेकिकचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलं आहे.पुरुष एकेरीचा अंतिम सामना उद्या नोव्हाक जोकोविच आणि गतविजेता कार्लोस अल्काराझ यांच्यात होणार आहे. सर्बियाच्या जोकोविचनं काल रात्री झालेल्या उपांत्य फेरीत इटालियन लोरेन्झो मुसेट्टीविरुद्ध विजय मिळवला तर अल्काराझनं उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून स्पर्धेतील सलग दुसरी अंतिम फेरी गाठली.पुरुष दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत हेन्री पॅटन आणि हॅरी हेलिओवारा या ब्रिटिश-फिनिश जोडीचा सामना आज संध्याकाळी मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन या ऑस्ट्रेलियन जोडीशी होणार आहे.महिला दुहेरीत कॅनडाची गॅब्रिएला डब्रोव्स्की आणि न्यूझीलंडची एरिन राउटलिफ या जोडीचा सामना आज रात्री अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या कॅटेरिना सिनियाकोवा आणि अमेरिकेच्या टेलर टाउनसेंड यांच्याशी होणार आहे.मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत उद्या पोलिश तैवान जोडी जॅन झिलिंस्की, हसिह सु-वेई आणि मेक्सिकन जोडी सँटियागो गोन्झालेझ, जिउलियाना ओल्मोस यांच्यात लढत होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा