जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सतीश कुमार करुणाकरनने काल योकोहामा इथं पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश केला. आज सतीशचा सामना जागतिक क्रमवारीत चाळीसाव्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या कांताफोन वांगचारोएन याच्याशी होईल. भारताच्या किरण जॉर्ज याला मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जपानच्या कांता त्सुनेयामाकडून २१-१९, २१-१४ असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत बी. सुमीत रेड्डी आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. ऋतुपर्णा पांडा आणि श्वेतपर्णा पांडा यांचाही महिला दुहेरी प्रकारात डेन्मार्कच्या ज्युली फिन इप्सेन आणि माई सरो या जोडीनं पराभव केला.
Site Admin | August 22, 2024 1:37 PM | Badminton Tournament | Japan Open 2024
जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या सतीश कुमारचा पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश
