जपानमध्ये आज सकाळी सायबर हल्ल्यामुळे अनेक वेबसाईटची सेवा खंडित झाली. वेबसाईटच्या प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे सेवा खंडित झाल्याची माहिती एनटीटी डोकोमो या जपानच्या सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीनं दिली. जपानमध्ये अलीकडेच झालेल्या अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यामुळे राष्ट्रीय बँका आणि विमानतळ ऑपरेटरसह, अनेक कंपन्यांची यंत्रणा कोलमडली होती.
Site Admin | January 2, 2025 8:32 PM | Cyber Attack | Japan
जपानमध्ये सायबर हल्ल्यामुळे अनेक वेबसाईटची सेवा खंडित
