महाराष्ट्रातल्या महिला आज स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहायला हवं म्हणूनच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वांद्रे पूर्व इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
आजपर्यंत राज्यातल्या १ कोटी १० महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्याचे ३ हजार रुपये जमा झाले आहेत. राज्यातल्या २ ते अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महायुती सरकारनं महिला. युवक, युवती, शेतकरी यांच्यासह विविध घटकांसाठी चांगल्या योजना आणल्या आहेत. यापुढंही अशा योजना चालवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी ठाम राहावं, असे आवाहन अजीत पवार यांनी केलं.
यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, आमदार झीशान सिद्दिकी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.