श्रीजनी फाउंडेशनच्या संस्थापिका वीणा उपाध्याय यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३१वा ‘जानकीदेवी बजाज पुरस्कार’ प्रदान केला. आयएमसी चेंबरच्या महिला विभागातर्फे हा पुरस्कार दिला जातो. वीणा उपाध्याय यांनी बावनबुटी साडी विणणाऱ्या महिला कारागिरांना प्रोत्साहन देऊन या कलेचं पुनरुज्जीवन केलं आणि बिहारमधल्या ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं. यासाठी हा पुरस्कार त्यांना दिला गेला.
Site Admin | January 8, 2025 3:34 PM | Jankidevi Bajaj Award
वीणा उपाध्याय यांना ३१वा ‘जानकीदेवी बजाज पुरस्कार’ प्रदान
