डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू इथं प्रचारसभेत बोलत होते. या निवडणुकांनंतर जम्मू काश्मीरमध्ये एक नवीन अध्याय लिहिला जाईल असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात जम्मू काश्मीरच्या ४० मतदार संघांमध्ये येत्या मंगळवारी मतदान होणार आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचीही  प्रचारसभा आज जम्मू इथं होणार आहे.

 

दरम्यान, केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूका शांततेत पार पडत असल्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते काल जम्मू काश्मीरमध्ये कथुआ इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. 

 

हरयाणात ९० विधानसभा मतदार संघांमध्येही येत्या ५ तारखेला मतदान होणार असून तिथेही प्रचारानं वेग घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काल अंबाला, कुरुक्षेत्र आणि रेवारी मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या. काँग्रेस नेत्या कुमारी सेलजा यांच्याही प्रचारसभा काल कलनवाली आणि दबवाली इथं झाल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा