लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथल्या पंचायत समितीच्या नव्या इमारतीचं तसंच तहसील आणि प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते आज उदगीर इथं आले होते. यानिमित्त आयोजित मेळाव्याला पवार यांनी संबोधित केलं. मेळाव्यानंतर ते पोलिसांची वसाहत, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत.
Site Admin | September 30, 2024 7:47 PM | उपमुख्यमंत्री अजित पवार | जनसन्मान यात्रा