जन सुराज पार्टीचे नेते आणि राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांना आज पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतलं. बिहार लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षेत पेपर फुटल्याचा आरोप करत ते उपोषण करीत होते. प्रशांत किशोर यांच्या समर्थकांनी या कारवाईविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. किशोर यांना आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
Site Admin | January 6, 2025 12:53 PM | Jan Suraj Party | Prashant Kishor
जन सुराज पार्टीचे नेते प्रशांत किशोर यांना अटक
![जन सुराज पार्टीचे नेते प्रशांत किशोर यांना अटक](https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2025/01/Screenshot-2025-01-06-125312.png)