कटरा ते श्रीनगर या दरम्यानचा प्रवास ३ तास १० मिनिटात करणारी जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे लवकरच सुरु होईल, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.
या रेल्वेला आठ डबे असतील बनिहाल ते कटरा या १११ किलोमीटरच्या टप्प्याची सुरक्षाविषयक अंतिम तपासणी सुरू झाल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या वर्षी रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरू होईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. जम्मू स्थानकाचाही पुनर्विकास सुरू असून तिथं आठ फलाट आणि आधुनिक सेवासुविधा सुरू होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, जम्मू-श्रीनगर वंदे भारत रेल्वे हिमवृष्टीतही चालू राहण्याच्या दृष्टीनं व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेच्या ट्रॅकवर बर्फ पडल्यास सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी बर्फ हटवणारी रेल्वेगाडीही विशिष्ट काळात चालवली जाईल.