जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाड जिल्ह्यातल्या वार्षिक श्रीमचैलमाता यात्रेला सुमारे १ लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे.
किश्तवाड प्रशासनानं यात्रेला भेट देणाऱ्या भाविकांसाठी 4-G कनेक्टिव्हिटी, हेलिकॉप्टर सेवा आणि ऑनलाइन नोंदणी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
जम्मू काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आणि जम्मू काश्मिरमध्ये शांतता, समृद्धी आणि विकास होण्याबाबत देवीला साकडं घातलं. तसंच भक्तभवनात भाविकांसाठी नव्या प्रशस्त यज्ञशाळेचं उदघाटन त्यांनी केलं.