उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचिंद्र कुमार यांनी जम्मू काश्मीर खोऱ्यातल्या सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांना राज्यातली सुरक्षा व्यवस्था आणि अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी लष्करानं केलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. लेफ्टनंट जनरल सुचिंद्र यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यात आला.
जवानांचं प्रशिक्षण,गुप्तचर यंत्रणांना अधिक सक्षम करणं आणि लष्करी कारवाईत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं त्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीर पोलिस विभागाचे विशेष महासंचालक नलिन प्रभात यांनीही सुचिंद्र कुमार यांची भेट घेत त्यांच्याशी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली.