जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने काल 40 स्टार प्रचारकांची नावं जाहीर केली. यात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. याबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहरलाल खट्टर, जी. किशन रेड्डी, जितेंद्र सिंह आणि शिवराजसिंह चौहान हे देखील प्रचाराची धुरा सांभाळतील. 90 सदस्यीय जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जम्मू इथं प्रसिद्ध करणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
Site Admin | September 6, 2024 12:20 PM | #JammuKashmirElections2024 | BJP