डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी स्थानिक प्रशासन सज्ज होत आहे. जम्मू काश्मीरमधे मुख्य निवडणूक अधिकारी पी. के. पोल यांनी मतदारांसाठी विशेष जागृती अभियान सुरु केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा स्वीप कार्यक्रम येत्या १८ सप्टेंबरपासून पूर्ण केंद्रशासित प्रदेशात राबवला जाणार आहे. या जागृती अभियानात मतदार मतदान करण्याची शपथ घेणार असून त्यांना मतदान प्रतिबद्धतेचं प्रमाणपत्र दिलं जाईल. जम्मू काश्मीरमधे येत्या १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यातलं तर १ ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होईल.

 

हरियाणात राज्य पोलिसांखेरीज केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या २२५ कंपन्या निवडणूक प्रक्रीयेसाठी तैनात असतील. निवडणूक प्रक्रीया भयमुक्त आणि पारदर्शी पद्धतीनं व्हावी याकरता मतदान यंत्र, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष दिलं जात असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अगरवाल यांनी सांगितलं. 

 

हरियाणात एकाच टप्प्यात येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांमधली मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा