जम्मू आणि काश्मिरमध्ये कथुआ जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ३ जणांचे मृतदेह सापडले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीसांकडून एका दलाची स्थापना करण्यात आली असून या प्रकणाचा कसून तपास करण्यात येईल अशी ग्वाही जम्मू कथुआ सांबा भागाचे पोलिस उपमहानिरीक्षक शिवकुमार यांनी दिली. ५ मार्च रोजी एका लग्न समारंभातून ३ जण बेपत्ता झाले होते, त्यांचे मृतदेह मलहार भागातील इशू नालानजिक आढळून आले आहेत. कठुआचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना आणि सैन्य अधिकाऱ्यांचे सहायक विनय खोसला यांच्यासमवेत, पोलिस उपमहानिरीक्षक यांनी बिल्लावार इथं स्थानिकांची भेट घेऊन, सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत केली जाईल असं आश्वासन दिलं. लष्कर आणि निमलष्करी दलांसह, पोलिस, विशेष अभियानासाठीचा गट आणि कर्मचारी यापुर्वीच या परिसराची सुरक्षेसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अशी माहिती उपमहानिरीक्षकांनी दिली.
Site Admin | March 10, 2025 10:55 AM | Jammu & Kashmir
Jammu-Kashmir : एकाच कुटुंबातील तीघांचे मृतदेह सापडल्याप्रकरणी कसून चौकशी
