जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल रात्री काश्मीर भागात शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघन केलं. याला भारतीय सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
या चकमकींमध्ये भारतात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास विविध यंत्रणा करत आहेत. संपूर्ण काश्मीर जिल्ह्यात शोधमोहिमा राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचं विशेष पथकही तपासकार्यात गुंतलं आहे.