डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था

पहलगाम इथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी अधिक विमान उड्डाणं आयोजित करण्याविषयी चर्चा केली. नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेतली.

 

विमान कंपन्यांना नियमित भाडे पातळी राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही नायडू यांनी विमान कंपन्यांना दिले. दिल्ली आणि मुंबईसाठी प्रत्येकी दोन अशा चार उड्डाणांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे.

 

जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी उड्डाणांची संख्या वाढवल्याची माहिती समाजमाध्यमावर दिली आहे. तिकीट आरक्षित असलेल्या प्रवाशांना तिकिटात सवलत तसंच, वेळापत्रकात बदल झाल्यानंतर होणारा अतिरिक्त खर्चही घेण्यात आलेला नाही.

 

तिकीटं रद्द करणाऱ्या प्रवाशांना रकमेची परतफेडही करण्यात येत आहे. महाराष्ट्रातले अनेक पर्यटक अजूनही जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकल्याची शक्यता असल्यानं त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्याची विनंती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारकडे केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा