जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सोपोर भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी काल रात्री संयुक्तरित्या शोधमोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यानच चकमक सुरू झाली आणि त्यात दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रं, दारुगोळा आणि आक्षेपार्ह सामुग्री जप्त करण्यात आली आहे.
Site Admin | November 8, 2024 8:26 PM | JammuAndKashmir
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार
