डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दहशतवादाच्या विरोधात साऱ्या जगाचा भारताला पाठिंबा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जगभरातल्या नेत्यांनी तीव्र निषेध करत, भारताला पाठिंबा दर्शवला आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाविरोधातल्या लढाईत अमेरिका भारतासोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला.

 

ब्रिटनचे प्रधानमंत्री केअर स्टारमर यांनी हा विनाशकारी असल्याचं म्हणत, हल्ल्यातले पीडित आणि भारतीय नागरिकांसोबत सहेवेदना व्यक्त केल्या आहेत.जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यातले जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन यांनी या कठीण काळात भारतासोबत असल्याचं म्हटलं आहे. 

 

इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांनीही या हल्लाच्या तीव्र निषेध केला आहे.युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनीही या संकटात युरोप भारतासोबत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे.

 

गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी या हल्ल्याला घृणास्पद कृत्य म्हणत, या हल्ल्याचा निषेध केला आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी हिंसाचाराचं समर्थन करता येणार नाही असं म्हणत या हल्ल्याचा निषेध केला.

 

न्यूझीलंडचे परराष्ट्र व्यवहार मंत्री विन्स्टन पीटर्स यांनी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत, भारताला पाठिंबा दर्शवला आहे. भारतातल्या युक्रेन दूतावासानं या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा