डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू-कश्मिरमधे जनतेनं आशा आणि प्रगतीसाठी कौल दिला – नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला

जम्मू-कश्मिरमधे भाजपा आणि मित्रपक्षांच्या राजकारणाला जनतेनं नकार दिला असून, आशा आणि प्रगतीसाठी कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे. गंदरबल इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, येत्या काही दिवसात मित्रपक्षांशी चर्चा करुन पुढचा कृती कार्यक्रम ठरवला जाईल.

 

दरम्यान, उमर अब्दुल्ला हे नव्या आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असतील, असं  नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी जाहीर केलं आहे. 

 

दुसऱ्या बाजूला पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी पक्षाचा पराभव मान्य केला आहे. मात्र आपल्या पक्षानं जिंकलेल्या जागा पुरेश्या नसल्या तरी ताकद कायम आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. जम्मू कश्मिरच्या जनतेनं स्थीर सरकारला पसंती दिली असून, त्यासाठी त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीवर विश्वास दाखवला आहे, असं त्या म्हणाल्या. 

 

हरयाणातल्या निकालामुळे काँग्रेस पक्ष निराश झालेला नाही, असं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. हरयाणा आणि महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी असून, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचच सरकार येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक आणि धक्कादायक असून, हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा